शिवसेना तालुका समन्वयक पदी सुदाम गायकवाड यांची निवड…!!!
बारामती
बारामती शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांची बैठक पार पडली,यावेळी निंबुत (ता. बारामती)येथील २५ वर्षापासून शिवसेनेत असलेले शिवसैनिक श्री सुदाम गायकवाड यांची पक्षाच्या तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली.जिल्हा प्रमुख संजय काळे व माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र काळे यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब शिंदे,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पिंगळे,तालुका प्रमुख निलेश मदने,आदिराज कोठडिया,निखिल देवळात,सुनीता खोमणे आदी उपस्थित होते…!!!
