संत सोपानकाका पालखीचे सोमेश्वरनगर मध्ये उत्साहात स्वागत…!!!
सोमेश्वरनगर
सोपानकाका पालखीचे आज हर्षमय वातावरणात वाघळवाडी–सोमेश्वरनगर येथे सरपंच हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार सकुंडे व इतर पदाधिकारी नी स्वागत केले.आज मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सोपानकाका पालखीचे पहिले गोल रिंगण पार पडले.
माऊली माऊली च्या जयघोषात हा रिंगण सोहळा अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडला,या सोहळ्याचे वैशिष्ट्य यंदा पोलिसांनी या रिंगण सोहळ्यात उस्फुर्त सहभाग नोंदवला. यावर्षी सोपानकाका पालखी बरोबर प्रचंड प्रमाणात वारकरी संप्रदाय सोबत आहे त्यामुळे या रिंगण सोहळ्यात वेगळेच नवचैतन्य निर्माण झाले होते.यावर्षी जवळपास ९० दिंड्यांनी सोपानकाका पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला आहे…!!!
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तमदादा जगताप, प्रमोदकाका काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे,काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे सर, करंजेपुल पोलिस स्टेशन चे साबळे साहेब व सहकारी,व्हाइस चेअरमन मिलिंद कांबळे,शैलेश रासकर,ऋषिकेश गायकवाड, लक्ष्मण गोफणे,रमाकांत गायकवाड,सुचिता साळवे, निता फरांदे आणि काकडे महाविद्यालयाचा स्टाफ उपस्थित होता…!!!
