निंबुत चा मुक्काम उरकून संत सोपानकाका पालखी सोहळा निंबुत छपरी येथे दाखल…!!!
निंबुत
संत सोपानकाका पालखी सोहळा काल बारामती तालुक्यात दाखल झाला. निंबुत हे बारामती तालुक्यातील संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे पहिले मुक्कामाचे ठिकाण,पालखी सोहळ्यासाठी निंबुत ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!!!
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोदकाका काकडे, सतिशभैया काकडे, शहाजीकाका काकडे निंबुत चे सरपंच अमरभैया काकडे,मदन काकडे,विक्रम काकडे,उद्योजक अमर काकडे,गणेश आप्पा फरांदे या मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले.बाबालाल काकडे शाळेचे विद्यार्थी यांनी लेझिम पथकाचा सुंदर खेळ सादर केला…!!!
निंबुत चा मुक्काम उरकून पालखी सकाळी ८ वाजता निंबुत छपरी येथे दाखल झाली.यावेळी निंबुत चे सरपंच अमरभैया काकडे, सोमेश्वर कारखाना संचालक लक्ष्मण गोफणे,भगवान दादा सोसायटी चे चेअरमन शरद फरांदे, व्हाइस चेअरमन अशोक लकडे,सदस्य नंदकुमार काकडे, अभिजित काकडे,राजेंद्र ठोंबरे, शिवाजी दगडे,शिवाजी लकडे यांनी केले…!!!
निंबुत छपरी ग्रामस्थ यांच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी, चोपदार रणवरे महाराज व इतर सहकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला…!!!

