माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान वेळेत एक तासाने वाढ…!!!
शिवनगर, माळेगाव
संपुर्ण तालुक्याचे नव्हे महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माळेगाव सह साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात असून उद्या यासाठी मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. कमालीची रंगतदार झालेला प्रचार, चौरंगी लढत आणि निळकंठेश्वर पॅनल चे चेअरमन पदाचे उमेदवार स्वतः अजितदादा आणि सहकार बचाव पॅनल चे चेअरमन पदाचे उमेदवार काल सांगता सभेत रंजनकाका तावरे यांनी चंद्रराव अण्णा चे जाहीर केले…!!!
यामुळे निश्चितच चुरशीची लढत होणार आहे.माळेगाव चे सुद्न्य सभासद कोणाच्या पारड्यात वजन टाकतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. निवडणूक आयोगाने कालच निवडणुकीसाठी एक तासाने मतदानाचा वेळ वाढवून यात भर टाकली आहे.सुरुवातीचा मतदानाचा वेळ हा सकाळी ७ ते ५ होता तो आता सकाळी ७ ते संध्याकाळी ६ करण्यात आलेला आहे.
वाढलेला वेळ कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडतो हे पाहावे लागणार आहे.मतदानाची वाढीव टक्केवारी ही कायमच सत्ताधारी पक्षाला लाभदायक ठरते हा आजवरचा इतिहास आहे.त्यामुळे वाढलेला वेळ कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते मतदानाची टक्केवारी वाढवून उपयोगास आणतात हे पाहावे लागणार आहे…!!!
