निरा – सोमेश्वरनगर परिसरातील सोमेश्वर सायकलिंग क्लब चे सदस्य निरा ते पंढरपुर तब्बल १५० किमी सायकल स्वारी करून विठुराया चरणी नतमस्तक…!!!
सोमेश्वरनगर

सोमेश्वरनगर
सोमेश्वरनगर परिसरातील युवकांनी नुकतीच सोमेश्वर सायकलिंग क्लब ची स्थापना केलेली आहे.यामध्ये कित्येक प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला आहे.यामध्ये सायकलिंग क्लब चे सदस्य रोज ५० ते ६० किमी सायकल चालवून आरोग्यासाठी सायकलिंग किती महत्वाचे आहे याविषयी ते जनजागृती करत असतात.
पाठीमागील एक वर्षापासून हा त्यांचा उपक्रम चालू आहे, कालांतरानुरूप यामध्ये वाढ होत चालली असल्याचे आपणास पहावयास मिळत आहे.या सायकलिंग क्लब यंदा च्या वर्षी निरा ते पंढरपुर ही सायकल वारी सुरू केली.यामध्ये परिसरातील सायकल प्रेमींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.१४ व १५ जुन रोजी ही वारी १५० किमी अंतर पार करून हे सदस्य विठुराया चरणी लीन झाले...!!!
यामध्ये परिसरातील सायकलप्रेमी तसेच आरोग्यप्रेमी सुनिल पाटिल सर,सदोबाची वाडीचे उपसरपंच ऋषिकेश धुमाळ,उद्योजक गणेश मगर आणि डॉ सौरभ काकडे यांच्याबरोबर रोहिदास कोरे, निरेतून धनंजय देशमुख, हिम्मत चव्हाण, राजवीर चव्हाण,मुकुंद शेंडकर,सोनटक्के सो तसेच फलटण मधून श्रीराम मुळीक सराफ,तुकाराम कोकाटे यांनी सहभाग नोंदवला...!!!
यंदा हे या वारीचे पहिले वर्ष असून दरवर्षी ही वारी आयोजित करण्याचा या सदस्यांचा मानस आहे.यामधून आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे, डॉ सौरभ काकडे याविषयी मार्गदर्शन व माहिती देत असतात...!!!
.

