बारामती तालुका वन विभाग,श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, व ग्रामपंचायत वाघळवाडी – सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण लागवड मोहीम सुरू…!!!
सोमेश्वर नगर
सोमेश्वर परिसरातील सुजाण आणि निसर्गप्रेमी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,आपण आपल्या परिसरातील विद्या प्रतिष्ठान शाळेच्या मागील वन विभागाच्या टेकडीवर बारामती तालुका वन विभाग,श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, व ग्रामपंचायत वाघळवाडी – सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत आहोत. यामध्ये परिसरातील
शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, नागरिक, वृक्षप्रेमी अश्या अनेकांच्या श्रमदानातून हे वृक्षारोपण सर्वाच्या एकत्रित सहभागातुन करावयाचे आहे.
याचा फायदा नक्कीच आपल्या सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्वांनाच होणार आहे. एकूण १०,००० वृक्षांचे वृक्षारोपण करीत असताना त्यापैकी ५,००० वृक्ष आपण लोकसहभागातून गोळा करीत आहोत. सोमेश्वरनगर परिसरात पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने ‘*नक्षत्रवन उद्यान वाघळवाडी-सोमेश्वरनगर*’ हे वनउद्यान साकारण्यात येत आहे. या वनउद्यानाच्या मध्ये विविध कामे करण्यात येणार आहेत. बारामती वनविभाग,श्री.सोमेश्वर सह.साखर कारखाना,सोमेश्वनगर आणि ग्रामपंचायत वाघळवाडी असे सयुंक्तरित्या वनउद्यानाच्या ठिकाणी काम होत आहे. कायमस्वरूपी झाडांना पाणी देण्यासाठी २० लाख लि.क्षमतेचे शेततळे, ७० एकर क्षेत्रातील सर्व झाडांना ठिबक,पंपहाऊस,झाडांचे खड्डे असे काम सोमेश्वर कारखान्याने केले असून या ठिकाणी १० हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असून आपलाही सहभाग यात असावा या करिता झाडे देऊन आणि श्रमदान करून या मोहिमेत आपण सहभागी व्हावे.
आपल्या भागाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने सुरू केलेल्या या मोहिमेमधे आपण सर्वांनीच योगदान दिलं पाहिजे असं आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे. तरी ज्याना शक्य आहे अश्या वृक्षप्रेमींनी विविध प्रजातीची देशी वृक्ष देऊन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सोमेश्वर नगर परिसरातील वृक्षप्रेमी ,निसर्गप्रेमी नागरिकांना करण्यात आलेले आहे…!!!
या अभियानांतर्गत खालील झाडांची लागवड करण्यात येणार आहे
आपटा, शमी, सावर, मोहगणी, कदंब, चिंच, वड, पिपळ, बहावा, इंडियन ख्रिसमस, पळस,बकाणा, पांगारा, भेंडी, आकाशनिंब (बुच), महारुख, शल्मीकी (सावर), सीतारंजन, जारूळ,करंज, लाल कांचन, नाद्रुक, जांभूळ, कैलासपती, उंबर, भोकर, चेरी, हिरडा, बेहडा,अंजन, चाफा, मोह, आवळा, कवट, अर्जुन, बेल, ताम्हन, खाया, रिठा, हिरवी सावर,शिवण, पिवळा पळस, वेत, ताबट, वावडिंग, कोकम, चंदन, सुरंगी, धामन, अंजन,काटेसावर, रुद्राक्ष पार, जांभळ, शमी, चारुळी, पिवळा कांचन, पांढरा कांचन,गुलाबी कांचन, बांबू, धावडा, बिजा, उबर, कुसुम आदी वनविभागाच्या नियमाच्या अधिन असलेले वृक्ष…!!!
अधिक माहितीसाठी निसर्ग मित्र सरपंच हेमंत गायकवाड
9404685238 आणि
निसर्ग मित्र नवनाथ रासकर
9699944176
