१६ जुन कार्यकर्ते मोठे करणाऱ्या नेतृत्वाचा वाढदिवस…!!! वाढदिवस आदरणीय सतिशभैया काकडे यांचा.!
निंबुत
बारामती तालुक्यातील पूर्वीपासून राजकारणात आणि सहकारात नावलौकिक असणारं गाव म्हणून निंबुत गावची ओळख.१९१९ साली साहेबराव दादा यांनी सहकारी सोसायटी ची स्थापना करून निंबुत गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही...!!!
याच सहकारमहर्षी कुटुंबातील दुसऱ्या पिढीमध्ये त्यांची साहेबरावदादा यांची मुले यशवंतराव दादा(भगवानदादा यांचे वडिल), मुगुटराव आप्पा, लोकनेते बाबा, शिवाजीराव अण्णा,संभाजीलाला, रामतात्या, शामकाका, भगवाननाना,सखाराम तात्या, आत्माराम आबा या पिढीने सहकार वाढवून ती परंपरा पुढे चालवली...!!!
तिसऱ्या पिढीत ही परंपरा महारथी आदरणीय सतिशभैया, आदरणीय शहाजीकाका आणि आदरणीय प्रमोदकाका यांनी आजही चालू ठेवली. निंबुत च्या काकडे कुटुंबियांचे महाराष्ट्राच्या राजकारणात वर्चस्व आणि दबदबा कायम राहिलेला आहे.राज्यात सत्तेत कोणताही पक्ष असला तरी निम्म्याहून अधिक मंत्री हे या कुटुंबाचे स्नेही असतात...!!!
याच कुटुंबातील काकडे गटाची आणि कुटुंबियांची धुरा सांभाळणारे रोखठोक अनं तितकेच प्रेमळ व्यक्तिमत्व आदरणीय सतिशभैया काकडे देशमुख यांचा उद्या (१६ जुन) वाढदिवस, भैय्यांची राजकारणातील कार्यपद्धती बद्दल अनेक जण बोलत असतात परंतु आदरणीय भैय्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभी करून त्यांना पाठबळ देण्याचं कामही तितक्याच शिताफीनं केलं.काही आहेत बरोबर काही सोडून गेले परंतु मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केलं असल्याने बऱ्यापैकी मी त्यांचा सुरुवातीच्या कारकिर्दीतला कार्यकर्ता होतो याचा मला विशेष अभिमान आजही वाटतो...!!!
भैयांचा कोणताही राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रम असला की त्याचे नियोजन २००६ सालापासून मदनभैया,तत्कालीन योगेश यादव (सोळसकर सर) आणि विक्रमभैया यांच्यावर असायचे ती जबाबदारी ते मदन भैया आणि विक्रम भैया आजही पार पडतात.हे सांगायचा उद्देश एकच २००६ साली शरद जोशी यांची सोमेश्वर कारखाना परिसरात ऊस परिषद आयोजित केली होती,त्यावेळी मदन भैया नुकतेच मानद सचिव झाले होते,मी,विनोद निकाळजे आणि तन्वीर सय्यद आम्ही नेहमीच अनॉउसिंग च्या गाडीवर पुकारायला असायचो.त्यावेळी संध्याकाळी चार वाजता ची भैयांची सभा ही त्याठिकाणी होती.( नुकतेच आमच महाविद्यालयिन शिक्षण त्यावेळी झाल होत आणि जवळच्या एका सह संस्थेत सहसचिव म्हणून मी जॉब ला होतो.) कार्यालयातून आम्हाला त्यावेळी जीप स्पीकर लावून देण्यात आली होती आम्हाला दोघांना ही फोर व्हिलर चालवता येत नव्हती परंतु ड्रायव्हर बरोबर असताना ओमिनी वॅन चालवताना मदनभैया यांनी आम्हाला पाहिलं होत.त्यांनी आम्हाला सांगितलं भैया पुढ गेलेलं आहेत तुम्हाला दोघांना ही जीप घेऊन सभास्थळी जायचं आहे कारण माईक,स्पीकर व इतर गोष्टी तुमच्याबरोबर च आहेत त्यामुळे पुढ जाऊन ही व्यवस्था तुम्ही करायची आहे.(प्रत्येक गावोगावी भैयांच्या सभा असायच्या स्पीकर सिस्टम ही गाडीबरोबरच असायची) आम्ही भीतभीत च गाडी चालवत तिथपर्यंत नेली.मदनभैयाकडे हे कौशल्य होत आणि आहे जबाबदारी टाकून त्या व्यक्तीकडून काम करून घ्यायचं.
अशा परिस्थितीत असा एक प्रसंग घडला की तो कायम आयुष्यात लक्षात राहिला...!!! माळवाडी (लाटे) याठिकाणी भैयांची सभा होती,सभा संपल्यानंतर गाडीतले डिझेल संपत आल्याने तन्वीर,विनोद आणि मी भैय्यांच्या कडे गेलो भैय्यांना डिझेल साठी पैसे मागितले. भैयानी लगेच दिले पण त्याचा उल्लेख भैय्यांनी एक वर्षांनंतर साखर संकुल येथील राजू शेट्टीच्या सभेत भावनिक होऊन आमची नाव घेऊन केला की,माझे कार्यकर्ते जेवायला पैसे मागत नाहीत पण गाडी पुढच्या सभास्थळी पोचली पाहिजे म्हणून डिझेल ला पैसे मागतात असे निःस्वार्थी कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत म्हणून माझी संघटना उभी आहे असे उद्गार त्यावेळी भैय्यांनी आमच्या बाबतीत काढले होते...!!!
भैया हक्काने रागावून बोलत असले त्याचा तो स्वभाव आहे तरी ही त्यांची फक्त एक बाजू आहे, दुसरी प्रेमळ आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देणारी बाजू कायमच झाकोळली गेलेली आहे...!!!
अशा या दिलदार,रोखठोक आणि स्पष्टवक्त्या, कार्यकर्ते मोठे करणाऱ्या नेतृत्वाला उद्याच्या वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा ...!!!
भैया आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
