फरांदेनगर,निंबुत येथे शिवराज्याभिषेक सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न…!!!
फरांदेनगर,निंबुत

. फरांदेनगर निंबुत,येथे तिथीनुसार येणारा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा सहकार,राजकीय तसेच सांप्रदायिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली.दिलीपदादा फरांदे,दत्तात्रय महाराज फरांदे, गणेश पवार,युवराज फरांदे यांनी महाराजांच्या कार्याचा ओझरती माहिती,इतिहास उपस्थित नागरिकांना सांगितली…!!!
यावेळी समता पतसंस्थेचे अध्यक्ष तसेच सोमेश्वर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन दिलीपदादा फरांदे, गणेश पवार,दत्तात्रय महाराज फरांदे,प्रकाश फरांदे,गणेश आप्पा,प्रमोद कदम, महात्मा ज्योतिबा फुले सोसायटी चे अध्यक्ष संभाजीराव फरांदे,युवराज फरांदे,प्रमोद फरांदे, निंबुत ग्रामपंचायत सदस्य रविंद्र जमदाडे, गुलाब पवार,गणपत रासकर, विक्रांत हुलगे,योगेश कदम, बापुराव सपकळ इ मान्यवर या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते तसेच नागरिकांसह महिलाही ची उपस्थिती ही या कार्यक्रमासाठी लक्षणीय होती. फरांदेनगर मधील नागरिक आणि युवकवर्ग सांप्रदायिक तसेच इतर कार्यक्रम हे नेहमीच सर्व समाज एकत्र येऊन सर्वसमावेशक करत असतात, महाराष्ट्रातील राजकारणाची परिस्थिती पहाता हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे.अशा आचरणासह छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ही जोपासणे खर तर ही काळाची गरज आहे…!!!
या सोहळ्याचे आयोजन कदमवस्ती,पवारवस्ती तसेच फरांदेनगर येथील युवकांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कदम यांनी केले तर आभार गुलाब पवार यांनी मानले…!!!!

