उमेदवार जाहीर होण्याअगोदर माळेगाव साखर कारखान्याची रणधुमाळी दोन्ही बाजूने सुरू,तिसरी गुलदस्त्यात…!!!
ग्राउंड रिपोर्ट,माळेगाव
निरा नदी खोऱ्यातील प्रतिष्ठीत अशा माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर झालेली आहे.मागच्या पंचवार्षिक मध्ये दिड महिना आधी तर यावेळेस हि निवडणूक चार महिने उशिराने होत आहे.निरा खोऱ्यात सोमेश्वर,माळेगाव आणि छत्रपती हे अग्रणी साखर कारखाने आहेत…!!!
सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती हे तिनही महत्वाचे कारखाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे आपणास पहावयास मिळते.छत्रपती कारखान्याची गेल्या काही वर्षांपासून आर्थिक घडी विस्कटल्याची दिसते.यासाठी अजितदादा यांनी पृथ्वीराज बापू जाचक यांच्यावर अध्यक्ष पदाची नुकतीच जबाबदारी दिलेली आहे. पृथ्वीराज बापू जाचक हे संस्थापक साहेबराव जाचक यांचे सुपुत्र आहेत तसेच सहकारातील आणि साखर उद्योगाचे अभ्यासक व्यक्तिमत्व आहे.आणि यापूर्वी त्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे तसेच ते महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष ही राहीले आहेत.तर माळेगांव आणि सोमेश्वर कारखाना यामध्ये मागील पंचवार्षिक मध्ये रंजनकाका अध्यक्ष असताना ऊस दरामध्ये मध्ये दराबाबतीत चढाओढ दोन्ही कारखान्याच्या परिसरातील सभासदांनी पाहिलेली आहे.याच पार्श्वभूमीवर सभासद,अजितदादा आणि चंदरराव अण्णा व रंजनकाका यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे.
उमेदवार जाहीर होण्याअगोदर दोन्ही पार्ट्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.खरं तर अस तालुक्यात प्रथमच पहावयास मिळत आहे .सभासदांच्या प्रपंचाचा विषय असल्याने यामध्ये बऱ्यापैकी सभासद हे यात राजकारण येणार नाही या मताचे अधिक असल्याचे पहावयास मिळते…!!! कारखाना परिसरात उलटसुलट चर्चांना ऊत आल्याचे दिसत आहे.काही सभासदांच्या मते निरा खोऱ्यातील या तीनही कारखान्यापैकी एक तरी कारखाना नेत्याच्या विरोधात असणं गरजेचं आहे.केवळ अस झाल्यास च सभासदांच्या ऊसाला स्पर्धा निर्माण होऊन योग्य भाव मिळू शकतो.असे उघडपणे सभासद बोलत आहेत. तस पाहायला गेल तर माळेगाव चा सभासद हा पूर्वीपासून सुशिक्षित आणि सुद्न्य असल्याचे इतर कारखान्याचे सभासद बोलत असतात.कारण या कारखान्यामध्ये विरोधात कायम चार दोन संचालक असतातच.
यंदा मात्र ही निवडणूक चुरशीची होणार यात तिळमात्र शंका नाही.याहून अधिकचे पवार साहेब यांनी अजून पर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाही ती अजून गुलदस्त्यात आहे…!!!
उमेदवारी अर्ज मागे घ्यायला दोन तीन दिवस बाकी आहेत. माळेगाव परिसरात घडामोडींना वेग आलेला आहे.वरिष्ठ पातळीवरून तडजोडी नाही झाल्या तर माळेगाव कारखाना निवडणूक आणि कारखान्याच्या सभासदांचा कौल पाहणे हा विषय तालुक्यात औस्तुक्याचा असणार हे नक्की…!!!
