योगेश भैया जगताप यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा…!!!
पणदरे
बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक योगेश भैया जगताप यांचा उद्या ५ जून रोजी वाढदिवस होत असून , योगेशभैया जगताप मित्र परिवार यांच्या वतीने हा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
माळेगाव कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याचा सोहळा हा योगेशभैया जगताप हे पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन या निमित्ताने करण्याची शक्यता आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाल्याची दिसून येत असून योगेशभैया जगताप हे अजितदादांच्या मनातील माळेगाव चे भावी चेअरमन असू शकतात. पाठीमागील पंचवार्षिक मध्ये ही योगेशभैया यांनी यासाठी प्रचंड ताकद आणि फिल्डिंग लावली होती हे सर्वांनी पाहिले आहे.
योगेश भैया यांनी यावेळी उमेदवारी अर्ज भरताना तसेच मुलाखती वेळी ही कार्यकर्त्यांची प्रचंड फळी आपल्या मागे असल्याची झलक दाखवली होती.
या निवडणुकीमध्ये दादांनी आधीच सांगितले आहे की अध्यक्ष पदाचा उमेदवार ते निवडणुकीपूर्वी च जाहीर करणार आहेत. योगेशभैय्या यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा मानाजीनगर,पणदरे येथील त्यांच्या बलवंत फॉर्म या निवासस्थानी होणार असून यासाठी ते शुभेच्छा स्विकारण्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून उपस्थित असणार आहेत…!!!
