दादा ऑन ड्युटी : उन्हाळा हिवाळा पावसाळा खरंच हवामान बदलतं, पण अजितदादांच्या कामाची गती मात्र कधीच कमी होत नाही…!!!
बारामती
बारामती शहरात आणि तालुक्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयातील सर्व कार्यक्रम आणि मीटिंग रद्द करून आपल्या नेहमीच्या रूटीन प्रमाणे पहाटे ६ वाजता आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.हवामान बदलतं, पण अजितदादांच्या कामाची गती मात्र कधीच कमी होत नाही.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पहाटे सहा वाजताच्या सुमारास बारामती येथील ऐश्वर्या बेकरीमागे, एम.आय.डी.सी. येथे पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधत काळजी करू नका आम्ही सर्व आपल्या सोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला…!!!
आपत्ती व्यवस्थापनासाठी बारामती मध्ये NDRF च्या टिम दाखल झालेल्या आहेत.शक्य तितक्या नुकसानग्रस्त भागास दादा आज भेट देणार असल्याचे कळते...!!!
