बारामती चे मा नगराध्यक्ष योगेश जगताप यांचे चिरंजीव अथर्व जगताप याला बेंटली युनिव्हर्सिटी यूएस मधून बॅचलर ऑफ सायन्स ची पदवी…!!!
पणदरे,बारामती
बारामती नगरीचे मा नगराध्यक्ष आणि माळेगांव कारखान्याचे विद्यमान संचालक योगेश भैया जगताप यांनी त्यांच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी यूएस मधील बेंटली युनिव्हर्सिटी येथे ॲडमिशन घेतले होते. अथर्व योगेश जगताप यांनी या युनिव्हर्सिटी मधून बॅचलर ऑफ सायन्स ची इकॉनॉमिक्स फायनान्स या विषयामध्ये पदवी संपादन केली. या पदवीचा पदवीग्रहण समारंभ पाठीमागील आठवड्यात बेंटली युनिव्हर्सिटी येथे पार पडला.
. योगेश जगताप आणि त्यांच्या पत्नी पुनम जगताप ही दोघेही आपल्या मुलाच्या पदवीग्रहण समारंभाला आवर्जून उपस्थित राहिले.अथर्व योगेश जगताप याने मिळवलेल्या यशासाठी त्याच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे…!!!

