श्री सोमेश्वर सह. कारखान्याकडुन सन २०२१-२२ ते सन २०२४-२५ याचार गाळप हंगामाचे FRP रक्कम विलंबाने दिल्याने त्याचे अंदाजे ५ कोटी ८२लाख रूपये व्याज सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावे – श्री सतिशभैया काकडे…!!!
गणेशआप्पा फरांदे सहसंपादक
श्री सोमेश्वर सह. साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर ता. बारामती जि. पुणे या कारखान्यान्याने सन २०२१-२२ सन २०२४-२५ या चार गाळप हंगामामध्ये उस तुटल्यापासुन १४ दिवसांमध्ये उसाची एकरक्कमी FRP देणे कायद्याने बंधनकारक आहे. ती FRP विलंबाने दिल्याने त्याचे जवळपास अंदाजे ५ कोटी ८२ लाख रूपयांच्या वर होणारे व्याजाची रक्कम सभासदांना मिळालीच पाहिजे कारण
सभासदांनी या रक्कमेवर सोसायट्या व बँकेची व्याजे भरलेली आहेत. तसेच चालु वर्षी कोर्टाने देखीलbFRP एक रक्कमी देणे बाबतचा महत्वाचा निकाल दिलेला आहे.
सोमेश्वर कारखान्यास उत्कृष्ठ कार्यक्षमता व इतर कारणांसाठी १० ते १२ पुरस्कार मिळालेलेआहेत. मागील दोन ते तीन वर्षामध्ये सोमेश्वर कारखान्याने जादा उसाचे गाळप करून उच्चांकी कशिंग,चांगला साखर उतारा, उच्चांकी साखरपोती, जादाचे उपपदार्थ उत्पादन व विज निर्मितीमध्ये अग्रेसर असल्याने कारखान्याने मागील काही वर्षापासुन उच्चांकी अंतिम दर दिलेला आहे. असे असतानाही कायम FRP रक्कम विलंबाने देवुन बेकायदेशीरपणे कायद्याचे उल्लंघन करून FRP चे तुकडेही केलेले आहेत.चालु २०२४–२५ हंगामात तर २ महिने विलंबाने कायद्याचा कुठलाही आधार नसताना २८००/- रूपयेच पहिली उचल दिली आहे. व FRP ची उर्वरीत रक्कम ५ ते ६ महिन्याने दिली आहे. तसेच कारखाना प्रशासनाला केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ नुसार विलंबाने दिलेल्या FRP रक्कमेवर १५ टक्के व्याज द्यावेच लागणार आहे व यापुर्वीही कारखान्याकडुन शेतकरी कृती समितीने ते वसुल केलेले आहे.विलंबाने देण्यात आलेल्या अंदाजे FRP ची व्याजाची रक्कम
तपशील
सन २०२१ – २०२२ : १ कोटी ८५ लाख रूपये
सन २०२२ – २०२३ : १ कोटी रूपये
सन २०२३ – २०२४ : ६५ लाख रूपये
सन २०२४ – २०२५ : २ कोटी ३२ लाख रूपये
