बारामती : अहिल्यादेवी शासकीय सर्वोपचार रुग्णालयामध्ये नवीन सहा डायलिसिस मशीन दाखल…!!!
बारामती
बारामती MIDC भागात कार्यरत असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील डायलिसिस कक्षामध्ये सहा डायलिसिस मशीन कार्यरत झालेल्या असून त्यापैकी एक मशीन ही हिपॅटायटिस _बी या रुग्णांच्या डायलिसिस साठी राखीव ठेवण्यात आली आहे.सदर डायलिसिस सुविधेचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासन यांच्यातर्फे करण्यात आले आहे…!!!
सदरची सेवा ही पुणे मुंबई याठिकाणी आधी उपलब्ध होते जे की बारामती व बारामती परिसरातील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील डायलिसिस रुग्णांना खर्चिक होते. आरोग्यातील बदलामुळे आणि शेतीत होणाऱ्या रासायनिक प्रयोगांमुळे कर्करोगाचे प्रमाण सर्वत्र वाढल्याचे चित्र असताना डायलिसिस सारखी सुविधा, तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णाचे पुणे मुंबई होणारे खर्चिक हेलपाटे वाचून बारामती त उपचार होणार असल्याने गरजू डायलिसिस रुग्णांना याचा फायदा होणार आहे…!!!
