चांगभल…!!! पाठीमागील आठवड्यात झालेल्या भारत आणि ब्रिटन देशाच्या करारात बियर वरील कर निम्म्याने कमी…!!!
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण जगभरात जागतिक मंदींचे संकट असताना,भारत आणि ब्रिटन यांच्या मुक्त व्यापार कराराच्या अंतर्गत या दोन्ही देशांच्या दरम्यान नवीन करार झाला आहे.हा करार पुढीलप्रमाणे आहे,ब्रिटिश बियर वर असणारा कर हा भारत सरकारने ५०% कमी केलेला आहे.भारताने हा १५०% हून ७५% इतका केला आहे.
याचा फायदा बियर प्रेमींना होणार आहे.देशात सध्या दमट वातावरण असताना या दिवसात बियर पिणाऱ्यांची संख्या ही वाढत असते त्यात ब्रिटिश कंपनी च्या भारतात लोकप्रिय असणाऱ्या बियर स्वस्त होणारा असल्याने बियर ची किंमत ही अर्ध्याहून अधिक किमतीने कमी होऊ शकतो.
. बियर प्रेमींसाठी ही मोठी खुशखबर असून त्यांची आर्थिक बचत ही भारत सरकारच्या निर्णयाने होणार आहे. या करारामुळे या दोन्ही देशांच्या व्यापारवाढीला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे…!!!
