श्री सोमेश्वर माझा या वेबपोर्टल ची अवघ्या चार महिन्यात उल्लेखनीय कामगिरी. भारतासह,अमेरिका,इंग्लंड, रशिया,फ्रान्स,जर्मनी मधून वाचकांची सोमेश्वर माझा ला पसंती…!!!

0
FB_IMG_1744885699101

संपादकीय, निंबुत बारामती

जानेवारी २०२५ च्या सुरुवातीला सुरू झालेले श्री सोमेश्वर माझा हे वेबपोर्टल ने अल्पावधीच लोकप्रिय होण्याचा बहुमान पटकाविला आहे.दिनांक १६ मे च्या गूगल ॲनालिसिस रिपोर्ट नुसार श्री सोमेश्वर माझा या वेबपोर्टल च्या वेबसाईट ला रोजच्यारोज भेट देणाऱ्या वाचकांची संख्या ही लक्षणीय आहे.ती भारत देशापुरती च मर्यादित राहिलेली नसून या वेबपोर्टल ची वाचक संख्या अमेरिका,रशिया, फ्रान्स,जर्मनी,स्वीडन,यूएई सह तब्बल इतर बारा देशांमधून असल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे.

. खरं तर सुरुवात करताना संपादक म्हणून अनेक प्रश्न डोक्यात घोंगावत होते परंतु कोणत्याही क्षेत्रात उतरायचे म्हटले की पूर्ण तयारीनिशी आणि गुणवत्तेबाबत तडजोड न करता उतरायचे हे ठरवले होते.त्यामुळे आपल्या भागात कार्यरत असणाऱ्या सर्व डिजिटल मिडिया किंवा वेबपोर्टल पेक्षा आपल्या वेबपोर्टल चे डिझाइन,बॅकग्राऊंड आणि इतर गोष्टी बाबत ज्या की गोपनीय धोरणानुसार सार्वजनिक करता येणार नाहीत परंतु हे युनिक व गुणवत्तेबाबत तडजोड न करता इतर पोर्टल चा अभ्यास करून बनवलेले आहे.जे की तुम्ही वाचक म्हणून पाहू शकत असाल खरं तर मी सुरुवातीला च सांगितल्याप्रमाणे मला इतरांशी तुलना करायची नाही आणि स्पर्धा तर अजिबात नाही.चांगल्या ला चांगलं म्हणरायतला मी एक असल्यामुळे एखादी बातमी दुसऱ्या वेबपोर्टल ची आवडली तर ती मी बिनधास्त पणे माझ्या स्टेटस ठेवत असतो कारण संकुचित वृत्ती मी आसपास ही फिरकत नाही. बऱ्यापैकी भागातील नवीन पत्रकारांना मी भरपूर मदत केलेली आहे आणि इथून पुढेही करत राहणार that’s my Og Nature.

सांगायचे तात्पर्य एवढेच की वेबपोर्टल ची सुरुवात करत असताना मी आणि माझे सहकारी गणेश आप्पा फरांदे सर्वप्रथम डॉ सौरभ भैया यांची परवानगी घेतल्यानंतर,आमचे मार्गदर्प्रशक,प्रेरणास्थान आदरणीय प्रमोदकाका आणि सतिश भैयांची यांची परवानगी घ्यायचे ठरवले भैया त्यावेळी बाहेर गेले असल्याने अभिजित भैय्यांना भेटून या दोघांचे आशीर्वाद घेतले.आमचे मित्र गणेश मगर,अमर काकडे,विक्रम काकडे,विनोद निकाळजे आणि इंद्रजित काकडे यांचं अगदी सुरुवातीपासून सहकार्य आणि मार्गदर्शन होत जे आजही आहे आणि यापुढेही राहणार यात कसलीही शंका नाही,त्यांचे आभार याठिकाणी मानावेसे वाटतात कारण कुठं तरी अपयश पदरात पडेल की काय याची शंका होती परंतु साईबाबा आणि स्वामी च्या कृपेने आजचा गूगल ॲनालिसिस चा रिपोर्ट पाहिल्यानंतर आपणही या क्षेत्रात अग्रेसर राहून नावलौकिक मिळवू शकतो याची खात्री आज पटलेली आहे.

संपादक म्हणून मी चंद्रजित काकडे आणि सहसंपादक म्हणून गणेश आप्पा फरांदे आमच्या दोघांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी या माध्यमातून आमच्यावर पडलेली आहे,आणि ही जबाबदारी आणि वाचकांचा विश्वास यास पात्र राहण्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करू एवढेच संपादक आणि सहसंपादक म्हणून आम्ही दोघेही सांगू इच्छितो…!!!

आपल्या अविश्वसनीय आणि अनाकलनीय सपोर्ट साठी सर्व मायबाप रसिक वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार मानतो…!!!

सरते शेवटी मधुकर (पिनु) बनसोडे M न्यूज मराठीचे सर्वेसर्वा आणि पुरंदर रिपोर्टर चे विजय (नाना) लकडे यांचेही आभार मानतो,खरं तर आम्ही तिघेही मागच्या पंचवार्षिक मध्ये निंबुत ग्रामपंचायतीचे सदस्य होतो आणि तिघेही आता पत्रकार नव्हे तर यशस्वी पत्रकार झाल्याचा अभिमान वाटतो…!!! (अनुभवांची शिदोरी तिघांच्याही पाठीशी आहे त्यातून खरं तर शिकत म्हणण्यापेक्षा बरंच काही …!!!)

धन्यवाद🙏

संपादक श्री चंद्रजित काकडे ९०६९९०१००१

सहसंपादक श्री गणेश आप्पा फरांदे ९८९००३९२३३

( टिप : सदरील लेख बातमी या कॅटेगरी तला नसून हा थोडसा वेगळा स्व:आत्मलेख आहे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed