सोमेश्वर पब्लिक स्कूल चाही दहावीचा निकाल १०० टक्के,सोमेश्वरनगर भागात सर्वत्र मुलींचा डंका…!!!
सोमेश्वरनगर
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना परिसरातील श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेले सोमेश्वर पब्लिक स्कूल सोमेश्वरनगर या इंग्लिश मिडीयम स्कूल च्या २०२४/२०२५ बॅच चा दहावी चा निकाल यावर्षी १००% लागला. यामध्ये मुलींनी च बाजी मारल्याचे चित्र हे बारामती तालुक्याचा पश्चिम भागात दिसत आहे.
सोमेश्वर पब्लिक स्कूल ची स्थापना १९७५/१९७६ साली तत्कालीन कारखान्याचे चेअरमन बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांनी श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमातून केली होती.या स्थापनेला चालू शैक्षणिक वर्षात पन्नास वर्षे पुर्ण होत आहेत.चालू शैक्षणिक वर्ष हे या शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असणार आहे.
दहावीचा निकाल यंदा १००% टक्के लागला असून तिनही क्रमांक मुलींनी पटकावले असल्याचे आपणास दिसून येत आहे.
प्रथम क्रमांक : गायकवाड तन्वी राजेंद्र 👉 ९३.८०%
द्वितीय क्रमांक : घाडगे अंतरा अजित 👉 ९१.२०%
तृतीय क्रमांक : सोनवणे श्रावणी सोमनाथ 👉 ९०.२०%
सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी चे आणि शिक्षक वर्गाचे अभिनंदन सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन श्री पुरुषोत्तमदादा जगताप, व्हाइस चेअरमन श्री मिलिंद कांबळे, सचिव श्री भारत खोमणे, मुख्याध्यापिका काकडे मिस व संचालक मंडळ यांनी केले.विशेष म्हणजे सध्या सोमेश्वर कारखान्याचे व्हाइस चेअरमन म्हणून कार्यरत असणारे मिलिंद कांबळे हे याच कॉन्व्हेन्ट शाळेचे माजी विद्यार्थी आहेत…!!!
SPS
