शेतकरी कृती समितीने सोमेश्वर कारखान्या विरोधात उठविला आवाज
????????????????????????????????????
गणेशआप्पा फरांदे-९८९००३९२३३
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 या गळीत हंगामासाठी 2800 रुपये पहिली उचल जाहीर केली असून याबाबत सर्व सभासद अणि ऊस उत्पादक सभासदांमध्ये तीव्र नाराजी अणि संताप व्यक्त केला जात आहे.
शेतकरी कृती समितीने या विरोधात आवाज उठविला असून सभासदांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे .राजकीय दृष्टिकोन न ठेवता एक सभासद,,शेतकरी म्हणून सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे परिसरातून बोलले जात आहे,परंतु गेले 15 दिवस अजूनही याबाबत कसलेही पाऊल उचलले गेले नाही. शेतकरी कृती समिती याबाबत काय निर्णय घेणार,,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष, सतीश भैया काकडे हेच याबाबत सभासदाना न्याय देऊ शकतात,अशी चर्चा सभासदांमध्ये चालू आहे .
गेट केन ऊस बंद करा,,3300 रुपये पहिली उचल द्या अणि सदर रक्कम व्याजासकट मिळाली पाहिजे, अशी मागणी शेतकरी कृती समितीने केली असून ,याला नक्की कितपत यश येईल, अणि सभासद किती साथ देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
