१००% टक्के निकालाची परंपरा कायम राखत श्री बाबालाल साहेबराव काकडे ( दे ) विद्यालय निंबुत ता बारामती व पिंपरे ता पुरंदर येथील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परिश्रमांणा अभूतपूर्व यश…!!!
श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय, निंबुत, ता–बारामती एसएससी बोर्ड परीक्षा विद्यालयाचा निकाल १००% , निकालाची परंपरा कायम, यंदाचाही निकाल शंभर टक्के…!!!
निंबुत येथील श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयाने सन २०२४/२०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी (एस.एस.सी.) फेब्रुवारी/मार्च २०२५ परीक्षेत १००% निकाल मिळवून पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि परिश्रमाची उजळणी केली आहे.
विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे आहे :
१) प्रथम क्रमांक – कु. बनसोडे सानिका लालासो – ९०.८०%
२)द्वितीय क्रमांक – कु. माने मानसी संतोष – ८४%
३)तृतीय क्रमांक– कु. खुडे रसिका राजेंद्र – ८३.८०%
शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
या यशाचे संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश भैय्या काकडे देशमुख, सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजितभैया काकडे देशमुख,उपाध्यक्ष सौ. सुप्रियाताई पाटील,मानद सचिव श्री मदनराव काकडे देशमुख, ज्येष्ठ संचालक श्री भीमराव बनसोडे सर, तसेच मुख्याध्यापिका सौ ननवरे दिपाली विनोद यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. गावातील सर्व ग्रामस्थांनीही विद्यार्थी आणि शिक्षकवृंदाचे कौतुक करत अभिनंदन केले.
“या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन,शिक्षकेतर कर्मचारी यांचे परिश्रम आणि संस्थेचे भक्कम पाठबळ यांचे मोठे योगदान आहे.”
दरम्यान, सन २०२५/२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते दहावी (सेमी व नॉन-सेमी) वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळेची गुणवत्तापूर्ण अध्यापनपद्धती, १००% निकालाची परंपरा, शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, डिजिटल वर्ग खोल्या, संगणक कक्ष, सायन्स लॅब, यामुळे पालकांचा शाळेवर दृढ विश्वास आहे.
इच्छुक पालकांनी त्वरित संपर्क साधावा, कारण प्रवेश मर्यादित जागांसाठीच आहेत.
संपर्क:
मुख्याध्यापक – सौ दिपाली विनोद ननावरे
शाळा कार्यालय वेळ – सकाळी ८ ते दुपारी ११
मोबाईल 👉८७९६०७००५०/९७६६३९००९३


