लोणंद येथील पोलीस हवालदाराची मध्यरात्री खंडोबाचीवाडी येथील युवकाला मारहाण,वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…!!!

0
Screenshot_20250128-113849

सोमेश्वरनगर

         बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे १० मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रमोद क्षीरसागर व त्याच्या इतर दोन साथीदारांनी खंडोबाचीवाडी ता.बारामती घरासमोर झोपलेल्या युवकास व त्याच्या आईस जबरी मारहाण केली असून वडगाव पोलीस स्टेशन येथे या पोलीस हवलदारावर व त्याच्या साथीदारावर गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने मोठी खळबळ माजली आहे.

फिर्यादी निखिल पोपट लकडे (वय २७ व्यवसाय शेती, रा. खंडोबाचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांच्या घरी रात्री झोपेत असताना तीन आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश करून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. आरोपी क्रमांक १) प्रमोद धनसिंग क्षिरसागर, २) सुरज मारुती आडके, आणि ३) अविनाश पांडुरंग सरगर (सर्व रा. धुळदेव भिवरकरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) हे दारूच्या नशेत होते.

फिर्यादीचे पाय दाबून धरून ठेवण्यात आले व डोक्यावर लाकडी काठीने मारहाण करण्यात आली. फिर्यादीचे भाऊ विक्रांत लकडे व आई स्वाती लकडे यांनी बाहेर येऊन पाहणी केली असता आरोपी प्रमोद क्षिरसागर व सुरज आडके यांनी स्वाती लकडे यांना देखील मारहाण केली. विक्रांत लकडे याने हस्तक्षेप केला असता आरोपी प्रमोद क्षिरसागर यांनी “मी पोलीस आहे, तुला खल्लास करून टाकीन” अशी धमकी दिली. आरोपी अविनाश सरगर याने शिवीगाळ करत दमदाटी केली.ही गंभीर घटना घडत असताना फिर्यादीने आपल्या नातेवाइकांना,उमेश लक्ष्मण लकडे, किरण किसन लकडे, सचिन लक्ष्मण लोखंडे व रणजित किसन लकडे यांना फोन करून बोलावून घेतले. चौकशीत असेही स्पष्ट झाले की प्रमोद क्षिरसागर हा विक्रांत लकडे याच्या पत्नीच्या प्रकरणात देखील ढवळाढवळ करत होता, अशी माहितीआरोपीनेच दिली.

सदर आरोपी चारचाकी वाहन (MH11BH5465) घेऊन आले होते. पीडिताने तत्काळ ११२ वर कॉल करून पोलीसांना बोलावले. पोलीसांनी घटनास्थळी येऊन आरोपींना ताब्यात घेतले व करंजे पुल पोलीस चौकीत नेले. तेथे आरोपींची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यावेळी पोलीस हवालदार व त्याचे इतर दोन साथीदार दारूच्या नशेत असल्याचे सिद्ध झाले. फिर्यादी व त्यांच्या आईने बारामती सरकारी रुग्णालयात उपचार घेतले असून तक्रार नोंदविली आहे.

हा संपूर्ण प्रकार करंजे पुल पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रातील आहे. पीडिताने समक्ष भेटून हा सर्व प्रकार पोलीसाना संगीतला आहे.संबंधित पो.हवलदार एका माज़ी खासदारचा अंगरक्षक आहे, साहेबाना सांगून तुझ्याकड़े बघतो, माझी कोण वाकड करत नाही तुम्हाला काय करायचे ते करा आशी धमकी देखील तो देत होता ,त्या मुजोर पो.हवलदाराने करंजे पुल पोलीसांना देखिल अरेरावी केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणाचा तपास स.फौ. वारूऴे हे करत आहेत.
फिर्यादीने आरोपींची तपासपूर्ण चौकशी आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.सातारचे पोलिस अधीक्षक, विशेषतः पोलीस हवालदार प्रमोद क्षिरसागर विरुद्ध विभागीय आणि शिस्तभंगात्मक कारवाई करून कायदा सुव्यवस्था राखली जाईल का?असा प्रश्न जनतेच्या मनात आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed