तब्बल २५ वर्षांनी एकत्र येत पणदरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…!!!
पणदरे
पणदरे ता बारामती रविवार दिनांक ११ मे २०२५ रोजी नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे येथे इयत्ता दहावी २०००- २००१ या तुकडी ब या बॅच चा तबल २५ वर्षा नंतर स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी इयत्ता १०वी ब मधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यावतीने उपस्थितीत शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून टाळ्या च्या गजरात स्वागत करण्यात आले.तसेच मुख्याध्यापक व पर्यवेक्षक आणि शिक्षक वर्ग यांच्या वतीने दीप प्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले.सुरेखा जगताप या विद्यार्थिनींनी आपल्या मधुर वाणीने स्वागत गीत गाऊन सर्वांचे स्वागत केले.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रकारचे सूत्रसंचालन राजश्री रासकर व मिनाज आत्तार यांनी केले.
सर्वांच्या वतीने शाळेतील प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितीत विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी यांनी दहावीनंतर पुढे कशाप्रकारे शिक्षण घेतले आणि त्यातुन च काही विद्यार्थी शिक्षक झाले,वकील,डॉक्टर झाले काही मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्ट वर नोकरी करत आहेत काही विद्यार्थी देश सेवा करत आहेत,काही विद्यार्थी पोलीस मध्ये कार्यरत आहेत काहींजण आपली शेती चांगल्या प्रकारे करत आहेत काही विद्यार्थी उत्तम प्रकारे व्यवसाय करत आहेत आणि काही विद्यार्थी राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत.अशा बऱ्याच जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा देत हसत खेळत आपले मनोगत व्यक्त केले.प्रशालेतील हयात नसलेले शिक्षकांना व भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.उपस्थितीत मुख्याध्यापक पर्यवेक्षक व शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग यांचा सन्मान आठवण म्हणुन एक उत्कृष्ट प्रकारचे सन्मानचिन्ह व एक छोटंसं रोपट गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.तसेच या बॅचमधील जे विद्यार्थी आर्मीमध्ये भरती झाले आणि त्यांनी देश सेवा केली अशा विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व शिक्षक वर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर वडगांव निंबाळकर येथिल झी टॉकीज फेम इंटरनॅशनल व २०२४ यावर्षीचे बालगंधर्व पुरस्कार विजेते आदरणीय शिवम जादूगार यांनी आपल्या जादुई कलेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांचे मनोरंजन केले.त्यानंतर शाळेच्या प्रांगणात एक आठवण म्हणुन वृक्षारोपण करण्यात आले व उपस्थितीत विद्यार्थी विद्यार्थिनींना एकमेकांच्या वतीने आठवण म्हणून एक छोटसं रोपट भेट देण्यात आले…!!!
मुख्याध्यापक शिंदे सर,काळे सर,काकडे सर,ढोबळे सर,पवार सर,महाद्दार सर व शिपाई रमेश ननावरे हे या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट प्रकारच्या स्नेहभोजनाचा सर्वांनी मनमुराद असा आनंद घेतला आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला…!!!
या गोड स्नेह-मेळाव्याचे आयोजन प्रविण जमदाडे,गजानन कोकरे,मंगेश जगताप,पैलवान नानासाहेब मदने,मिनाज आत्तार,रणजित बगाडे,यांनी केले होते…!!!आभार काकासाहेब देवकाते यांनी मानले.
