शिवेंद्र चा ऐतिहासिक नामकरण सोहळा हजारोंच्या उपस्थितीत पार पडला.
निरा
दिनांक ८ मे २०२५ रोजी पार पडला ऐतिहासिक नामकरण सोहळा.सुमन गार्डन मंगल कार्यालय, कोरेगाव येथे श्री. सागर व सौ. वृषाली भोसले यांच्या सुपुत्र शिवेंद्र याचा शाही नामकरण सोहळा अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक थाटात पार पडला.कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण म्हणून श्री डान्स अकॅडमी,वाई यांच्यातर्फे सादर करण्यात आलेला शिवकालीन सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील परंपरा आणि इतिहासाची पुनरावृत्ती दाखवण्यात आली.
संपूर्ण सोहळ्याची थीम शिवकालीन ठेवण्यात आली, ज्यामुळे हा कार्यक्रम येणाऱ्या नविन पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरेल असे सांगण्यात आले.सर्व उपस्थित पै पाहुण्यांनी बाळ शिवेंद्र ला शुभाशीर्वाद देऊन त्याला जीवनभर सुख, समृद्धी आणि यश मिळवावे, अशी मनोकामना व्यक्त केली. विशेषतः प्रत्येक महिला पाहुण्यांना भोसले परिवाराच्या वतीने सन्मानपूर्वक रिटर्न गिफ्ट देण्यात आले.
या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबातील शिवेंद्र चे आजी आजोबा श्री चंद्रकांत कृष्णराव भोसले व सातारा जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ जयश्री चंद्रकांत भोसले तसेच दुसरे आजोबा व आजी म्हणून शिवाजीराव पिसाळ व सौ. जयमाला पिसाळ यांच्या शुभ आशिर्वाद होताच.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार श्री व सौ. शशिकांत शिंदे, प्रतिभाताई पाटील, प्रीती घार्गै, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, मुंबई महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, निंबुत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. उदयभैया काकडे देशमुख, तसेच माजी आमदार श्री. मानसिंगराव नाईक यांचे पुतणे श्री. विवेकराव नाईक यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अखेरीस शाही जेवण आणि आलेल्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट्स या सर्व बाबींनी शिवेंद्र चा नामकरण सोहळा एक संस्मरणीय सोहळा ठरला.
