पळशी येथे लाच स्विकारताना ग्रामसेवक पोलिसांच्या जाळ्यात…!!!
पळशी,बारामती
दिनांक ७/५/२०२५ रोजी पळशी ग्रामपंचायत येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक श्री कांतिलाल बापुराव काळाणे यांना बांधकाम ठेकेदाराकडून लाच घेत असताना वडगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
सदरची घटना ही पळशी ग्रामपंचायत च्या सिमेंट बंधाऱ्याच्या बिले मंजूर करण्याकरिता,बांधकाम ठेकेदार अतुल भिलारे व कांतिलाल काळाने यांच्या त बंधारा बिलाच्या कामातील दोन टक्के रक्कम ग्रामसेवक यांना पंचाच्या मध्यस्थीने द्यायचे ठरले व ती रक्कम पंचासमोर स्विकारताना ग्रामसेवक यांना वडगाव निंबाळकर पोलिस यांच्या कारवाईत बांधकाम व्यावसायिक अतुल भिलारे यांच्या फिर्यादीवरून रंगेहाथ पकडले…!!!
सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोनि अमोल भोसले हे करीत आहेत.
