छत्रपती साखर कारखाना निवडणूक भवानीनगर २०२५ :- शेतकरी कृती समिती आणि राष्ट्रवादी पक्षासह सर्वपक्षीय पॅनेल चे अधिकृत उमेदवार जाहीर…!!!

0
Screenshot_20250502-154739.Google

भवानीनगर
छत्रपती सह साखर कारखान्याची निवडणूक ही दहा वर्षे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असल्यामुळे साखर कारखाना परिसरात इच्छुक उमेदवारांची संख्या ही लक्षणीय होती. अजितदादा,दत्ता मामा भरणे व पृथ्वीराजबापू जाचक यांना पॅनेल बनवताना कसरत करावी लागली हे निश्चित च असणार,या इच्छुकांमधून सरस उमेदवार निवड करत असताना त्याठिकाणी नाराजीचा फटका बसू नये याची पुरेपूर काळजी तिनंही नेत्यांनी घेतल्याचे आपणास उमेदवार यादीवरून पहावयास मिळतं आहे.


येणाऱ्या १८ तारखेला ही निवडणूक पार पडत आहे आणि आज उमेदवार यादी जाहीर करत असताना अजितदादा आणि दत्तामामा भरणे यांनी पृथ्वीराजबापू जाचक यांच्या नेतृत्वाखाली अजूनही राहिलेल्या विरोधकांना कारखाना आता अडचणीत आहे आणि तो बाहेर काढण्यासाठी बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे आणि किरणदादा गुजर यांच्या वतीने करण्यात आले…!!!
उमेदवार यादी पुढीलप्रमाणे
गट नंबर १ लासुर्णे: पृथ्वीराज जाचक,शरद जामदार
गट नंबर २ सणसर : रामचंद्र निंबाळकर,शिवाजी निंबाळकर
गट नंबर ३ उद्धट : पृथ्वीराज घोलप,गणपत कदम
गट नंबर ४ अंथुर्णे : विठ्ठल शिंगाडे,प्रशांत दराडे,अजित नरुटे
गट नंबर ५ सोनगाव : अनिल काटे,बाळासाहेब कोळेकर,संतोष मासाळ
गट नंबर ६ गुणवडी : कैलास गावडे,सतीश देवकाते,निलेश टिळेकर
महिला राखीव प्रतिनिधी : माधुरी राजपुरे,सुचिता सचिन सपकळ
इतर मागास प्रवर्गातून : तानाजी शिंदे
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातून : डॉ योगेश पाटील
अनुसूचित जाती जमाती : मंथन कांबळे

या सर्व मान्यवरांना सर्वपक्षीय श्री जय भवानी माता पॅनेल मार्फत अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे…!!!

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले असून उर्वरित उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घ्यावेत असे आवाहन राजवर्धन शिंदे आणि किरण गुजर यांच्या वतीने करण्यात आले…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed