नर्मदा परिक्रमा तिलकवाडा गुजरात येथे का केली जाते…??? काय आहे आख्यायिका संक्षिप्त स्वरूपात…!!!

0
IMG-20250428-WA0002

Tilakvada,Gujrat
नर्मदा परिक्रमा फक्त नाव घेतलं किंवा नर्मदा परिक्रमा करायची असा विचार जरी मनात आला तरी ते पुण्य समजले जाते.कारण ही तसेच आहे.मध्यप्रदेश मध्ये अमरकंटक पर्वतरांगांमध्ये तिचं उगमस्थान आहे. भारतातील ही एकमेव अशी नदी आहे जी पश्चिमेला वाहते आणि गुजरात मधील भरूच येथे अरबी सागराला जाऊन मिळते.याबरोबरच ती तिलकवाडा याठिकाणी दहा किलोमीटर उत्तरेला वाहते म्हणून तिला उत्तरवाहिनी नर्मदा असे म्हटले जाते.
भारतातील बऱ्यापैकी नद्यांचे उगमस्थान उत्तर भारतात आहे आणि त्या दक्षिणेच्या दिशेने वाहतात.नर्मदा ही नदी मध्यप्रदेश मध्ये उगम पाऊण ती पश्चिमेला वाहते त्याबरोबर ती दहा किलोमीटर उत्तरेला वाहते जे की भारताच्या पौराणिक इतिहासात पवित्र मानले जाते…!!!
नर्मदा मैय्यांची अशी आख्यायिका आहे,जशी गंगा नदी भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते त्याप्रमाणे नर्मदा नदीही. हजारो लाखो वर्षापासून भारतातील लोक पापमुक्त होण्यासाठी काशीला किंवा गंगा नदीत स्नान करून आपली कळत नकळत घडलेली पापे गंगा नदीत विसर्जन होतात असे मानतात.संदर्भ इतिहासाचा आहेच. प्रयागराज ला काही महिन्यांपूर्वी झालेली तुफान गर्दी,जे की जगातील आश्चर्य म्हणून भविष्यात नोंद घेतली जाऊ शकते एवढ्या लोकांनी मौनी अमावस्येला तिथं अंघोळी केल्या…!!!
गंगा नदीने ही एकदा असंच महादेवांना विचारलं की मी हजारो लाखो लोकांची पापे धुवून अपवित्र झाली आहे मला ही पापमुक्त व्हायचे आहे.यासाठी गंगा नदीने महादेव प्रसन्न व्हावेत म्हणून महादेवांची तपश्चर्या केली.आणि महादेवांनी गंगा नदीला वरदान दिले की नर्मदा नदी तिलकवाडा गुजरात येथे दहा किलोमीटर उत्तरेच्या दिशेने वाहते तिथं जाऊन तू अंघोळ कर तू पापमुक्त होशील.अशाप्रकारे गंगा मैय्यांनी तीलकवाडा येथे जाऊन नर्मदा नदीत अंघोळ केली अशी आख्यायिका आहे…!!!

यामुळे संपुर्ण भारतवर्षातून लाखो भाविक याठिकाणी येत असतात.गुजरात सरकारने यासाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.नर्मदा नदी तिलकवाडा याठिकाणी उत्तरेकडे दहा किलोमीटर वाहत असली तरी परिक्रमा करण्यासाठी भाविकांना एकवीस किलोमीटर चालावे लागते. आपापल्या शारीरिक क्षमतेनुसार भाविक ही परिक्रमा पूर्ण करत असतात. साधारणतः ही परिक्रमा न थांबता पूर्ण करण्यासाठी सहा तासांचा कालावधी लागतो…!!!
नर्मदा परिक्रमा पूर्ण करणे हे पुण्यकर्म समजले जाते तर सलग तीन वर्ष नर्मदा परिक्रमा करावी असं येथील ऋषीमुनी याचं सांगण असतं…!!!
नर्मदा मैय्या जय…!!!
नर्मदे हर हर 🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed