पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० वी जयंती चे औचित्य साधून, आगामी मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक चौंडी येथे होणार…!!!
बारामती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या जयंती च्या पार्श्वभूमीवर त्यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी ता.जामखेड अहिल्यानगर इथं लवकरच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून त्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. ही बैठक २९ एप्रिल होणार असल्याची चर्चा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चोंडी इथं अशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे त्याची राज्य पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या काळात १७ सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ सप्टेंबर २०२३ मध्ये मंत्रिमंडळ बैठक झाली होती. त्यानंतर आता अशीच बैठक चोंडी इथं होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथभाई शिंदे ही बैठक घेणार आहेत…!!!
