निंबुत येथील प्रसिद्ध अशा काकडे कुटुंबातील युवा बांधकाम व्यावसायिक श्री दिग्विजय काकडे यांचा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे भाजप पक्षात प्रवेश…!!!

सोमेश्वरनगर
निंबुत ता बारामती येथील सहकारमहर्षी स्व भगवाननाना काकडे देशमुख यांचे नातू युवा उद्योजक आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक श्री दिग्विजय वसंतराव काकडे आणि कार्यकर्ते यांनी काल भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तर मा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेवनाना काळे,बारामती तालुका अध्यक्ष पी के जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भाजप कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला…!!!
यामुळे बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात भाजपला नवसंजीवनी मिळणार असल्याने,लवकरच दिग्विजय काकडे यांना भाजप पक्षाच्या कार्यकारिणीत नवीन मोठ पद मिळण्याची शक्यता आहे. दिग्विजय काकडे यांच्याबरोबर बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील दादा गरदडे,बापू लकडे,स्वप्नील जगताप,अनिल काकडे,संतोष जगताप यांसह होळ ,वडगाव येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…!!!
