भैरवनाथ यात्रा उत्सव २०२५ निंबुत ,,, २१ एप्रिल पासून निंबुत व परिसरातील नागरिकांसाठी कार्यक्रमांची पाच दिवस मेजवानी…!!!
निंबुत,बारामती
भैरवनाथ यात्रा उत्सव निंबुत म्हणजे बारामती तालुक्यातील सुप्रसिद्ध पूर्वीपासून चालत आलेला एक ऐतिहासिक परंपरा लाभलेला यात्रा उत्सव! बारामती तालुक्याच्या पश्चिमेला असलेल आणि राजकीय,सामाजिक, सहकार आणि कृषी क्षेत्रात अग्रेसर,नावलौकिक असणार गाव म्हणजे निंबुत…!!!
२०२४ साली लोकसभा निवडणूका असल्याने महाराष्ट्रात यात्रा उत्सव झालेले नव्हते,यंदा मात्र गावोगावी यात्रा जोरात चालू असल्याच्या आपणास पहावयास मिळतात.त्यातच निंबुत ची यात्रा म्हटलं की पाहुणे _ रावळे आणि परिसरात चर्चा तर होणार च.
या वर्षी २१ तारखेला देवाच्या लग्नापासून सुरू होणारी यात्रा सालाबादप्रमाणे पाच दिवस चालणार आहे.२१ तारखेला सिने अभिनेत्री दिप्ती आहेर यांचा नटखट अप्सरा या कार्यक्रमाने यात्रा उत्सवाला सुरुवात होणार असून,२२ तारखेला गोल्डन गर्ल सुवर्णा काळे यांचा सुपरस्टार धमाका हा कार्यक्रम आहे.२३ रोजी महिलांसाठी निखळ मनोरंजन असणारा अभिनेते रामभाऊ जगताप यांचा माय मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे तसेच २४ रोजी इनाम रुपये १ लक्ष असणाऱ्या भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यती पार पडणार आहेत आणि संध्याकाळी श्रीं ची मिरवणूक ( छबीना ) फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल,लेझीम यांचा खेळ होणार आहे यासाठी राज्यभरातून वेगवेगळी पथकं येणार आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट पथकास प्रथम क्रमांकासाठी ५१०००/ रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे.
मुख्य यात्रेचा दिवस २५ रोजी वसंत नांदवळकर सह रविंद्र पिंपळे यांचा लोकनाट्य तमाशा होणार असून संध्याकाळी नामांकित पैलवान हरियाणा व इराण या देशातून येणार असून यामध्ये प्रमुख तीन कुस्त्या पार पडणार आहेत,दोन लक्ष,एक लक्ष पन्नास हजार व १ लक्ष असे इनाम या प्रमुख तीन कुस्त्यांसाठी ठेवण्यात आलेले आहे.
भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ निंबुत यांच्या वतीने या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन परिसरातील तसेच गावातील वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना करण्यात आलेले आहे…!!!
