निंबुत छपरी येथील अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलावर वारंवार अपघात ?
निंबुत
निंबुत छपरी येथे निरा बारामती रोडवर असणाऱ्या कॅनॉल वरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे येथे वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात.याठिकाणी सुरक्षा फलक लावण्याची आवश्यकता आहे.
तसेच दोन्ही जुन्या व नव्या पुलांच्या मध्ये अंतर असल्या कारणाने येथील नागरिकांची सुरक्षितता आवश्यक असताना ठेकेदार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.रहदारीचा रस्ता असल्याने या रोड वर शाळा,महाविद्यालय,कारखाना असून विद्यार्थी,पालक तसेच चाकरमानी यांची नित्याचीच कसरत पहावयास मिळते.
आज सकाळी एक महिला पालक आपल्या लहान मुलीला शाळेत सोडण्यास जात असताना त्या काम चालू असलेल्या पुलावर ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे पडल्या थोडक्यात हा अपघात त्यांच्यावर व त्यांच्या लहान मुलीच्या जिवावर बेतला असता.मागील आठवड्यात अशाच प्रकारे दोन तीन अपघात याठिकाणी झाले आहेत.
लवकरात लवकर ठेकेदाराकडून अर्धवट अवस्थेत असलेल्या या पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने फलक लावण्याची मागणी निंबुत छपरी ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे…!!!
