गुड न्यूज, गुड न्युज, गुड न्युज…!!! महायुती सरकार चा मोठा निर्णय ?
मुंबई
मंत्रालय मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या परंतु जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या सदस्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांनी वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी केलेली होती.
राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते.याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असून याचा फायदा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मधील लोकप्रतिनिधी यांना होणार आहे…!!!
