समाजात काही अशीही माणसं असतात, यांवर खरं तर विश्वास च बसत नाही…!!!

0
IMG-20250407-WA0046

निरा
पिंपरी चिंचवड येथील नागरिक श्री रामचंद्र कुदळे हे गुरुवारी पंढरपूरला जात असताना त्यांना एस टी मध्ये एक पर्स सापडली. त्यांनी घरी गेल्यानंतर पाहिले तर त्या पर्स मध्ये एक गंठण आणि कानातले होते. ते ज्याचे आहे त्याला परत करायचे या भावनेतून पर्समध्ये काही कागदपत्रे सापडतात का ते पाहिले त्यांना पर्स च्या एका कप्प्यामध्ये फ्रिजची पावती सापडली त्या पावतीवर एक नाव आणि नंबर होता,त्या नंबर वरती फोन केला असता तो सियाचीन येथे कार्यरत असणाऱ्या तरडगाव येथील श्री जमदाडे यांचा आहे असे कळले,कुदळे नी त्यांच्या कडे हळूहळू कुटुंबाविषयी माहिती काढत त्यांना विचारलं की तुमच्या घरातल्यांचे काही हरवलं आहे का? यानंतर त्यांनी सर्व हकीकत सांगितली, मिसेस बहिणीच्या घरी कार्यक्रमाला गेली असता तिची पर्स ती विसरली असल्याचे त्यांनी सांगितले.
मग त्यांना पर्समध्ये काय काय आहे ते विचारले त्यांनी पर्स मधले सामानाचा विवरण बरोबर केलं. कुदळे यांची खात्री पटल्यानंतर, मग श्री जमदाडे यांनी घरी फोन करून त्यांच्या आईला, मिसेसला आणि छोट्या भावाला त्यांच्या पळशी ( शिरवळ ) गावात पाठवले आणि गावाचे सरपंचाला बोलावून पर्स मध्ये असणारे चार तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्याचे कानातले झुबे आणि रोख रक्कम ४०० रूपये त्यांना सुपूर्त केले .
आजच्या बाजार भावाप्रमाणे पाच लाखाच्या वरती या ऐवजाची किंमत असू शकते. परंतु तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचे लोभ न ठेवता कुदळे कुटुंबाने सौ. सविता जमदाडे यांना त्याचे स्रीधन परत केले. वस्तु परत मिळाल्या नंतर जो आनंद त्या सासुर वाशिनच्या चेहर्यावरती दिसत होता त्याची किंमत होऊ शकत नाही.असे कुदळे यांनी म्हटले,
खरंतर आजच्या युगात कुदळे कुटुंबियांसारखी ही माणसे असतात यावर विश्वास बसत नाही परंतु समाजात अजून पण अशी प्रामाणिक व निःस्वार्थी माणसे आहेत हे वास्तव आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed