अजातशत्रू,सर्वसमावेशक अन सर्वसामान्य कुटुंबातील लोकपरिचित तळागळातील धडाडीचा कार्यकर्ता,सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी अविरोध…!!!
सोमेश्वरनगर
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी मिलिंद कांबळे यांची आज ३ एप्रिल २०२५ रोजी अजितदादा यांच्या सूचनेनुसार अविरोध निवड करण्यात आली.
पुरंदर तालुक्यातील बाळासाहेब कामथे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या व्हाइस चेअरमन पदी होळ ( आठफाटा ) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रगतशील शेतकरी श्री मिलिंद बळवंत कांबळे यांची सोमेश्वर कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अजितदादा यांच्या सूचनेनुसार निवड झाली.
नुकतीच तीन महिन्यापूर्वी संचालक पदाची गळ्यात माळ पडलेल्या आणि इच्छुकांच्या गर्दीत कुठेच नाव नसणाऱ्या मिलिंदजी यांची निवड ही अजितदादा यांचे धक्कातंत्र मानले जात आहे. मिलिंद जी यांच्या निवडीमुळे काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही अजितदादांकडे संधी मिळू शकते हाच संदेश या निवडीतून पक्षात दिल्याची चर्चा परिसरात घडत असल्याचे चौकाचौकात पहावयास मिळाले…!!!
