निंबुत छपरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचा उद्घाटन सोहळा संपन्न…!!!

निंबुत
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जिल्हा परिषद शाळा निंबुत छपरी येथे नुकत्याच नव्याने बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोदकाका काकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
अध्यक्षीय भाषणात प्रमोदकाका यांनी नुकत्याच जिल्हा परिषद पुणे यांनी चालू केलेल्या स्तुत्य उपक्रमाची ओझरती माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इस्रो व नासा येथे प्रशिक्षणा साठी पुणे जिल्ह्यातून २५ मुलांची निवड ही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आपल्या गावातील परिसरातील मुलांना यासाठी तयार करण्याचे आवाहन काकांनी केले त्यासाठी वेळप्रसंगी ग्रामपंचायतीने मदत नाही केली तरी मी आणि माझे सहकारी त्या मुलांना हवी ती मदत मिळवून देऊ असे विद्यार्थी,पालक तसेच केशव जाधव गुरुजी,केंजळे गुरुजी व निंबुत केंद्रप्रमुख दगडे गुरुजी यांना आश्वस्त केले. या समितीत प्रमोदकाका यांच्या नेतृत्वाखाली वीरधवल जगदाळे, रणजित शिवथरे,शरद बुट्टे पाटील असणार आहेत.
सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व निंबुत छपरी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव गुरुजी यांनी शाळेचा ओझरता उल्लेख केला तसेच प्रमोदकाका यांनी शाळेचे बांधकाम होईपर्यंत शाळेला भगवानदादा काकडे ( देशमुख ) सोसायटी चा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.निंबुत केंद्रप्रमुख दगडे गुरुजी यांनी निंबुत छपरी येथील शाळा तीन वेळा तपासली असता शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि अभ्यास उल्लेखनीय असल्याचे आवर्जून सांगितले तसेच जाधव गुरुजींचे कौतुक केले.
आभार निंबुत चे उपसरपंच अमरभैया काकडे यांनी मानले.यावेळी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीकाका काकडे,केंजळे गुरुजी,आनंदराव खलाटे,शहाबुद्दीन भाई सय्यद,चंदर मामा काकडे,प्रविणमहाराज दगडे,आनंदराव लकडे,सदस्य हेमंत काकडे व ग्रामस्थ हे मान्यवर उपस्थित होते...!!!
