नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये होणार इतकी वाढ,लवकरच या योजनेचा हफ्ता जमा होणार…!!!
महाराष्ट्र सरकारने चालू केलेली नमो शेतकरी सन्मान योजना गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हफ्त्यांमध्ये ६००० रुपये मिळतात.
नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी महायुती सरकारने भरीव तरतूद केली असल्याचे कै वसंतराव नाईक सभागृहात स्पष्ट केले. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १९ वा हफ्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी केंद्र सरकारचे वार्षिक ६००० तर राज्य सरकार वार्षिक ९००० देणार असल्याचे त्यांनी घोषीत केले. महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये ३००० रुपयांची वाढ होणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात उपयोगी पडणारी ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे…!!!



