सोमेश्वर कारखान्याच्या भंगाराला लागली आग ? आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट…!!!
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वरनगर ता बारामती येथील सोमेश्वर सह साखर कारखान्याच्या भंगाराला बुधवारी १९ तारखेला दुपारच्या सुमारास आग लागली.
यामध्ये कारखान्याच्या साहित्याचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.दुपारच्या सुमारास आग लागल्याने धुराचे मोठे साम्राज्य परिसरात पहावयास मिळाले.यामुळे नागरिक भयभीत झाले.आगीवर उशिरा नियंत्रण मिळवण्यात कारखाना प्रशासनाला यश मिळाले.
परंतु आगीचे कारण आणि कारखान्याचे नुकसान या गोष्टी मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत.भंगाराचा निलाव झाला असल्याची स्थानिक चर्चा करत असल्याचे दिसून आले…!!!
