मिलिंद कांबळे यांची सोमेश्वर कारखान्याच्या रिक्त संचालक पदी वर्णी…!!!
सोमेश्वर नगर
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सप्टेंबर मध्ये रिक्त झालेल्या संचालक पदी आठफाटा येथील प्रगतशील शेतकरी, अजातशत्रू व्यक्तिमत्व श्री मिलिंद कांबळे यांची अविरोध निवड झाली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आदेशाने बारामती तालुका अध्यक्ष राजवर्धन दादा शिंदे व सोमेश्वर चे अध्यक्ष आणि संचालक मंडळ,बारामती तालुका AR श्री दुर्गाडे सो व श्री अमर गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
२०२१ मध्ये झालेल्या सोमेश्वर कारखाना सार्वत्रिक निवडणुकीत संचालक पदाने हुलकावणी मिलिंद कांबळे यांना दिली होती.आज त्यांची संचालक मंडळाच्या सभेत निवड झाल्याने सही करताना त्यांना अश्रू अनावर झाले.त्यांचे आजोबा हे गीते अण्णांच्या बरोबर पवार साहेबांचे, अजितदादांचे कार्यकर्ते होते,तिसऱ्या पिढीत ही त्यांनी ही परंपरा एकनिष्टने जपली त्याचे फलित झाल्याची चर्चा आज सोमेश्वरनगर परिसरात मिलिंद कांबळे यांच्या निवडीने रंगली असल्याचे पहावयास मिळाले…!!!
