“तीर भी चलाने हैं और परिंदे भी बचाने हैं।” अप्पर पोलीस महासंचालक {फोर्स वन} श्री कृष्ण प्रकाश सो { भा पो से } यांचे बारामती येथे पोलिस पाटील यांना मार्गदर्शन…!!!
बारामती प्रतिनिधी
पोलीस उप-मुख्यालय, बऱ्हाणपूर, ता. बारामती या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनातर्फे पोलीस पाटील मेळावा व तसेच प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री कृष्ण प्रकाश (भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक (फोर्स वन) महाराष्ट्र राज्य हे होते. या कार्यक्रमामध्ये काही पोलीस पाटलांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगता दरम्यान पोलीस पाटलांनी गावात पोलीस पाटील म्हणून काम करताना काय काय अडचणी येतात याबाबत सांगितले. एका गावच्या पोलीस पाटलांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पोलीस प्रशासन पोलीस पाटलांना किंमत देते परंतु महसूल प्रशासन पोलीस पाटलांना अजिबात किंमत देत नाही. उलट महसूल प्रशासन पोलीस पाटलांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे. एखाद्या वाळू धंद्याची माहिती पोलीस पाटलांनी महसूल प्रशासनाला दिली तर महसूल प्रशासन संबंधित वाळू व्यावसायिकाला सांगते की तुमच्या पोलीस पाटलांनी तुमच्या विरोधात तक्रार केली आहे आणि मग संबंधित वाळू व्यावसायिक पोलीस पाटलाला फोन करतो आणि तो पोलीस पाटलाला तुला मस्ती आली आहे का असे म्हणतो. यावर अप्पर पोलीस महासंचालक मा. श्री कृष्ण प्रकाश पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की “तीर भी चलाने हैं और परिंदे भी बचाने हैं।” श्री कृष्ण प्रकाश यांनी काही संस्कृत सुभाषितांचा दाखला देऊन पोलीस पाटलांनी कशाप्रकारे काम करायचे हा कानमंत्र समस्त पोलीस पाटलांना दिला. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील समस्त पोलीस पाटील, पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पुणे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उल्लेखनीय कार्य केलेल्या पोलीस पाटलांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
