पांगारे ता.पुरंदर येथील श्री निष्णाई देवी यात्रा…!!!
सासवड
काकडे देशमुख कुटुंबीयांचे मूळ गाव पांगारे ता. पुरंदर गावाची ओळख आहे,पांगारे येथील श्री निष्णाई देवी यात्रा दरवर्षी मा. शु चतुर्थी ला उत्साहात साजरी केली जाते. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत गावातील महिला सलग पाच दिवस अखंड उपवास धरून तो आज देवीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून सोडत असतात.
काकडे देशमुख कुटुंबीयांची महाराजांच्या काळात वतन मिळालेल्या गावातून काकडे भावकी प्रचंड प्रमाणात या दिवशी देवीच्या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहत असतात. पुरंदर/प्रचंडगड किल्ल्याच्या पर्वतरांगा मध्ये किल्याच्या मागच्या बाजूला पानवडी घाटात निश्नाई देवीचे मूळ स्थान मंदिर आहे. तिला धारेवरची देवी म्हणून संबोधले जाते.आजचा हा पालखी सोहळा निष्णाई देवीच्या धारेवरील मंदिरापासून पायी चालत दुपारी ४ वाजता गावातील मंदिरात येत असतो.

यासाठी काकडे देशमुख भावकी उत्साहाने सहभागी होऊन पालखीचे स्वागत करतात.
तसेच निंबुत गावात निष्णाई देवीचे मंदिर बांधल्या पासून म्हणजेच पाठीमागील वर्षीपासून देवीचा यात्रा उत्सव साजरा केला जातो.आज सकाळपासून विविध प्रकारच्या कार्यक्रमाला सुरुवात होऊन संध्याकाळी ६ वाजता देवीची पालखी ग्रामपदक्षणा/देवीचा छबिना झाल्यानंतर, महाप्रसादाने यात्रा उत्सवाची सांगता झाली…!!!


