पतसंस्था नोकरी ते एक यशस्वी उद्योजक थक्क करणारा प्रवास…!!! उद्योजक श्री नरेंद्र पवार
सासवड
जेजुरी येथील रहिवासी श्री नरेंद्र उर्फ हरिभाऊ पवार यांची यशोगाथा…
नरेंद्र पवार यांनी सुरुवातीला २००२ साली बीकॉम च शिक्षण पूर्ण केल्यानंतर,वडिलांच्या ट्रान्सपोर्ट धंद्यात लक्ष्य देत पतसंस्थेत नोकरी करायला सुरुवात केली.लग्न झाल्यानंतर त्यांची नोकरी पेक्षा धंदा स्वतःचा असावा ही महतत्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ वडिलांच्या ट्रान्सपोर्ट धंद्यात लक्ष द्यायला सुरूवात केली.
याबरोबरच त्यांनी एक क्रेन भाड्याने घेतली, हे करत करत त्यांनी क्रेन चा व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली.एक च्या दोन च्या चार करत आज त्यांच्याकडे स्वमालकीच्या १५ क्रेन आहेत.त्याबरोबर च त्याला जोडव्यवसाय म्हणून २०१६ साली त्यांनी पवार ऑटोमोबाईल नावाने आणखी एक व्यवसाय सुरू केला. अन तो यशस्वी करूनही दाखविला.
या सर्व प्रवासात त्यांना त्यांच्या अर्धांगिनी तसेच आई, वडिल व दोन मुली ह्याच खऱ्या त्यांच्या लक्ष्मी आहेत या सर्वाचा संपूर्ण पाठिंबा आणि साथ मिळाली.शून्यातून विश्व निर्माण करत असताना त्यांनी घेतलेली यशाची गरुड भरारी नक्कीच थक्क करणारी अशीच आहे.
