देवकीनंदन ठाकूर यांच्याकडून प्रयाग राज येथील कुंभमेळ्यात सनातन बोर्ड स्थापन करण्याची मागणी.
प्रयाग्रराज,उत्तरप्रदेश
आधुनिक काळातील अलाहाबादमधील प्रयागराज हे हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. हिंदू धर्मामध्ये पारंपारिकपणे नदी संगमाला शुभ स्थान मानले जाते. प्रयाग राज संगमाचे महत्त्व सर्वात पवित्र आहे कारण येथे पवित्र गंगा, यमुना आणि पौराणिक गुप्त सरस्वती एकत्र येतात.
याठिकाणी आज देवकीनंदन ठाकूर यांनी सनातन धर्मगुरू यांची बैठक बोलावली होती.यामध्ये प्रतिष्ठित साधुसंतांचा समावेश होता.अनेक महत्वाच्या बाबी वरती चर्चा झाल्यानंतर साधुसंत आणि सनातन धर्मासाठी एक नवीन बोर्ड सरकारने अस्तित्वात आणावे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करण्याचे एकमताने ठरले.
मौनी अमावस्येला प्रयाग राज येथील संगमावरती कुंभमेळ्यातील मुख्य स्नान होणार असल्याने येथे भक्तांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने उत्तर प्रदेश प्रशासनाने तयारी केल्याचे दिसून येत आहे.
