ज्योतिर्लिंग इंग्लिश मिडीयम स्कूल कॅपिटल किड्स निरा या शाळेत डॉ श्री व सौ रोहन लकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिन सोहळा आनंदात साजरा.,,
निरा
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निरा येथील ज्योतिर्लिंग इंग्लिश मिडीयम स्कूल कॅपिटल किड्स याठिकाणी शाळेचे संस्थापक डॉ श्री मच्छिंद्रनाथ मेरगळ सर यांनी या कार्यक्रमासाठी जिवनदीप हॉस्पिटल चे प्रमुख डॉ रोहन लकडे व प्रसकंदा लकडे या उभयतांच्या हस्ते संपन्न केला.,,
यावेळी शाळेतील विद्यार्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम ही पार पडले.
सौ प्रसकंदा रोहन लकडे यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे.त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर त्याच्या आवडीप्रमाणे त्याच्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक स्टाफ आणि इतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.
