सोमेश्वर पब्लिक स्कूल चा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न …!!!
सोमेश्वरनगर
सोमेश्वर पब्लिक स्कूल सोमेश्वरनगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे सोमेश्वर कारखान्याचे उप अध्यक्ष श्री बाळासाहेब कामथे,सोमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक पी बी जगताप सर, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री भारत खोमणे,SPS च्या मुख्याध्यापिका सौ काकडे मिस, उपमुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मिस ,कोकरे सर,पवार सर,मुळीक सर,निकम सर,जाधव मामा या अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उस्ताहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली…!!!नर्सरी पासून ते दहावी पर्यंत बालचमुंची उपस्थिती थंडीचे दिवस असताना देखील लक्षणीय होती.




