टाटा पंच: 2024 ची सर्वाधिक विक्री होणारी कार! 🚗
चार दशकांत प्रथमच, भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार मारुती सुझुकीची नाही! तर टाटा ची पंच ही सर्वाधिक विक्रेती म्हणून उदयास आली आहे आणि २०२४ मध्ये २ लाख युनिट्सचा टप्पा पार करणारे एकमेव प्रवासी वाहन होते.
दरम्यान, मारुती सुझुकी अल्टो, ज्याने २०१७ पर्यंत सलग १३ वर्षे भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे बिरुद धारण केले, ऑटोपंडित्झ डेटानुसार, २०२४ मध्ये १,०५,९२२ युनिट्सची विक्री नोंदवली.
2018 मधील 33.5 लाख युनिटच्या तुलनेत 2024 मध्ये भारताच्या कार विक्रीत जवळपास 28% वाढ झाली आहे. 🚙
NDTV रिपोर्ट नुसार, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणतात, “टाटा मोटर्ससाठी 2024 हे सलग चौथ्या वर्षी रेकॉर्डब्रेक वार्षिक विक्रीचे वर्ष आहे, ज्यामध्ये 565,000 युनिट्सची विक्री झाली”आहे.
स्रोत: NDTV
