एखाद्या खात्यात २४ महिने कोणताच व्यवहार झाला नाही तर ते खाते निष्क्रिय समजले जाते. निष्क्रिय जनधन खात्याची टक्केवारी मार्च २०२४ मध्ये १९ टक्के होती ती २४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
सर्वाधिक निष्क्रिय जनधन खाती बँक ऑफ बडोदामध्ये आहेत, या खांत्यांची संख्या दोन कोटी नव्वद लाख इतकी आहे. यानंतर पंजाब नॅशनल बँकेत दोन कोटी जनधन खाती निष्क्रिय झाली आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अशा खात्यांची संख्या एक कोटी ऐशी लाखांवर आहे. बँक ऑफ इंडियात या खात्यांची संख्या एक कोटी सव्वीस लाख इतकी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ ला प्रधानमंत्री जनधन योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे बँक खाती उघडण्याची मोहीम राबवली गेली होती.
ज्यांच्याकडे एकही बँक खातं नाही त्यांना खाती उघडून बँकिंग व्यवस्थेत आणलं गेलं होतं. दहा वर्षानंतर जनधन योजनेच्या प्रत्येक पाच खात्यापैकी चार बँक खाती निष्क्रिय झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार निष्क्रिय खात्यांची संख्या अकरा कोटींवर पोहोचली आहे...!!!
जी अजूनही वाढण्याची शक्यता आहे...!!!