लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृत्यर्थ आनंदपीठ लोकवक्ता करंडक स्पर्धा २०२६..!

0
IMG-20260228-WA0066
Spread the love

आनंदपीठ @भालगुडी डेज

कोण होणार
आवाज महाराष्ट्राचा!

लोकनेत्यांची मांदियाळी असलेल्या महाराष्ट्रात आज लोकनेते कुठे आहेत?
लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील, असे आज लोकवक्ते कुठे आहेत?

आम्ही शोध घेतोय अशा प्रभावी आणि प्रामाणिक लोकवक्त्यांचा.
महाराष्ट्रातील नामवंत परीक्षक
ठरवतील महाराष्ट्राचा महा-लोकवक्ता!

तुमची सामाजिक अथवा राजकीय भूमिका कोणतीही असो.
मात्र, तुमचे नाते हवे लोकांशी.
बांधीलकी हवी भूमिकेशी.
शब्दांचा फुलोरा नको फक्त,
आशय हवा तेवढाच सशक्त.

लोकनेते अजित पवार यांच्या स्मृत्यर्थ-
आनंदपीठ लोकवक्ता करंडक

२१ आणि २२ मार्च २०२६

सह्याद्रीच्या कुशीतील कोळवण खोर्‍यात आहे,
आनंदपीठ @भालगुडी डेज

पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर,
पवना डॅमपासून, तिकोना किल्ल्यापासून वीस मिनिटांवर.
या रम्य आनंदपीठावर रंगेल ही वक्तृत्व स्पर्धा.

हा परिसर बघूनच,
तुम्हाला ऐकू येईल तुमचा आतला आवाज.
जनसागराच्या साक्षीने,
तुम्हालाही सापडेल तुमची गाज!
इथे ठरेल, कोण होणार महाराष्ट्राचा आवाज!

कोण सहभागी होऊ शकेल?
अठरा ते सव्वीस वर्षे या वयोगटातील प्रत्येक व्यक्ती.

पारितोषिकेः
प्रथम क्रमांकः ५१,०००/- आणि मुख्य करंडक
द्वितीयः ४१,०००/- आणि सन्मानपत्र
तृतीयः ३१,०००/- आणि सन्मानपत्र

त्याशिवाय उत्तेजनार्थ कमाल सात पारितोषिकेः
प्रत्येकी ११,०००/- रुपयांची, सन्मानपत्रासह.

सर्व सहभागी वक्त्यांना प्रमाणपत्र.

विषयः
१. यशवंतराव चव्हाण ते अजित पवार
२. ही लोकशाही की डेटाशाही?
३. जातपितृसत्ताक व्यवस्थेचं काय करायचं?
४. जोहरान ममदानी आपल्याकडे जिंकू शकतो?
५. विकास, पण नक्की कोणाचा?
६. समता आणि प्रेमातूनच उगवेल उद्याचे आनंदी जग.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तपशील आणि नियमांसाठी आधी गुगल फॉर्म भरणे आवश्यक.

त्यासाठी संपर्कः
आनंदपीठ –
+919021274477
+919359003707

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed