समता नागरी सहकारी पतसंस्था ‘दीपस्तंभ पुरस्कारा’ने सन्मानित..!
निरा,पुरंदर
सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार, कडक आर्थिक आणि सभासदाभिमुख सेवेचा वसा जपणाऱ्या निरा परिसरातील समता पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला..!
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘दीपस्तंभ पुरस्कार’ नुकताच संस्थेला प्रदान करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात सहकार भारतीचे मा. उदयजी जोशी आणि राज्य फेडरेशनचे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटे यांच्या शुभहस्ते संस्थेचा गौरव करण्यात आला..!
पतसंस्था संस्थापक अध्यक्ष दिलीपदादा फरांदे यांचे मार्गदर्शन आणि संचालक, कर्मचारी तसेच ग्राहक यांच्या दृढ विश्वासामुळे हे शक्य झाले.यावेळी संस्थेच्या वतीने मुख्य व्यवस्थापक श्री. युवराज फरांदे, व्यवस्थापक श्री. राहुल ढोले, वरिष्ठ अधिकारी श्री. विक्रम जमदाडे, श्री. गणेश चव्हाण आणि श्री. किरण रासकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला..!
“समता पतसंस्थेची कार्यपद्धती ही सहकार क्षेत्रासाठी खऱ्या अर्थाने आदर्श आहे,” अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले..!
