सोमेश्वर सायकलिंग क्लब ची शिव सायकलिंग चॅलेंज स्पर्धा उत्साहात संपन्न..!
सोमेश्वरनगर
सोमेश्वरनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य सायकलिंग स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते. ही स्पर्धा सोमेश्वर सायकलिंग क्लब व सचिन आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती यामध्ये परिसरातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला..!

इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ही १० किलोमीटर सायकलिंग स्पर्धा दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि करंजेपुल पोलीस स्टेशन चे वारुळे साहेब यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला हिरवा कंदील दर्शविला. स्पर्धेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन सोमेश्वर मंदिर येथे पोहोचून पुन्हा पुतळ्यापर्यंत परतीचा प्रवास असा निश्चित करण्यात आला होता. आज झालेल्या या स्पर्धेमध्ये २०० स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला.सहभागी सर्व २०० स्पर्धेकांना मेडल तसेच सन्मान चिन्ह यांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांना अल्पपोहार ची व्यवस्था संयोजक यांच्या वतीने करण्यात आली होती..!

या स्पर्धेसाठी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी नागनाथ पाटिल साहेब व त्यांचे सहकारी तसेच आरोग्य विभाग व कर्मचारी, सोमेश्वर कारखाना तसेच निंबुत सोमेश्वर परिसरातील तरुण सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धक आणि प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व सहकारी मित्रांचे सोमेश्वर सायकलिंग क्लब सोमेश्वरनगर चे सुनिल पाटिल सर, डॉ सौरभ काकडे, युवा उद्योजक गणेश मगर, ऋषिकेश धुमाळ, रोहिदास कोरे, डी वाय जगताप, मोटे सर, उद्योजक इंद्रजित काकडे या सर्व संयोजकांनी आभार व्यक्त केले..!
