जि . प. प्राथमिक शाळा, चौधरवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उधाण..!

0
IMG-20260221-WA0075
Spread the love

चौधरवाडी (बारामती)

बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच २० फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले..!

या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे बहारदार सादरीकरण करत संपूर्ण गावकऱ्यांची मने जिंकली.कार्यक्रमाची सुरुवात दिमाखदार झाली. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये, गीते आणि नाटिका सादर केल्या. विशेषतः एका चिमुकल्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि शिववंदनेचा भव्य देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ठरला. हातात तलवार घेतलेला बालशिवाजी आणि सोबतच्या चिमुकल्या कलाकारांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.कार्यक्रमात भावनेचा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ‘दमलेल्या बाबांची कहाणी’ या गीतावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हृदयस्पर्शी नृत्याने उपस्थित महिला मंडळी भावुक झाल्या, तर ‘अजितदादा’ यांना श्रद्धांजली म्हणून सादर करण्यात आलेल्या गीतावर संपूर्ण गाव भावनिक झाल्याचे पाहावयास मिळाले. या सर्व बालकलाकारांना गावकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि टाळ्यांच्या कडकडाटाने परिसर दुमदुमून गेला..!

या शानदार कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे लोकनियुक्त सरपंच शशांक भैया पवार,पुरंदर रिपोर्टर चे संपादक विजय लकडे,उपसरपंच राहुल चौधरी, सोमेश्वर माझा चे संपादक चंद्रजित काकडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पापळ, मुख्याध्यापिका सौ बालगुडे मॅडम, सौ खामकर मॅडम यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि चौधरवाडीतील ग्रामस्थ व महिलावर्ग, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बालकलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed