निंबुत येथील तरुण अभिराम साळू मोटे अथक परिश्रमाच्या जोरावर BSF मध्ये..!
निंबुत,बारामती

निंबुत छपरी येथील किसन व संतोष गुलाब दगडे यांचा भाचा आणि संगिता साळू मोटे यांचा सुपुत्र अभिराम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन BSF च्या एक वर्षांपूर्वी घेतलेल्या परीक्षेत पास होऊन, येत्या २४ तारखेला त्याला पोस्टिंग मिळणार आहे..!

लहानपणापासून आपल्या मामाच्या गावी आईसहीत असल्यामुळे त्याच प्राथमिक शिक्षण निंबुत छपरी येथे तर पुढील शिक्षण सोमेश्वर विद्यालय येथे झाले. लहानपणापासून तो शेतीमध्ये आपले आजोबा गुलाब सोनबा दगडे आणि मामा किसन व संतोष यांना मदत करीत असायचा. महाविद्यालयिन शिक्षण घेत असताना आणि आर्मी-पोलीस भरतीची तयारी करीत असताना तो आपला आणि आपल्या आईच्या उदर निर्वाहासाठी शेतात औषध फवारणी करीत असायचा यासाठी त्याने नविन पेट्रोल पंप खरेदी केला होता.टाकीला ३०/४० रुपये याप्रमाणे तो टोमॅटो सिजन ला तसेच वर्षभर रोजनदारीने आई बरोबर काम करायचा.
यावरून त्याची शिक्षणाची आवड आणि जिद्द दिसून येते. अशा कठीण परिस्थिती तुन त्याने करंजेपुल येथील मातोश्री अभ्यासिका येथे प्रशिक्षण चे धडे गिरवले. आणि हे यश संपादन केले..!
त्याची निवड ही SSC GD BSF मध्ये झाली आहे अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी BSF. अथक परिश्रमाच्या जीवावर यश मिळू शकते त्यासाठी संयम ही आवश्यक असतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अभिराम साळू मोटे हा युवक आहे. आपल्या मामाच्या इथे राहून प्रतिकूल परिस्थिती वर मात करून त्याने हे यश संपादन केले आहे. आजच्या पिढीतील तरुणांनी या अभिराम च्या यशाकडे पाहून परीक्षाची तयारी ही करावी यासाठी हे आदर्श उदाहरणं आहे..!

निंबुत छपरी येथील भगवान दादा काकडे सोसायटी च्या सभागृहात त्याचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मा बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती प्रमोदकाका काकडे, सोमेश्वर कारखान्याचे मा अध्यक्ष शहाजीकाका काकडे, दत्तघाट ट्रस्ट निरा चे अध्यक्ष प्रदिपभैय्या काकडे,सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब फरांदे, उपसरपंच अमरभैय्या काकडे, सदस्य नंदकुमार काकडे, डॉ सौरभ काकडे, मातोश्री अभ्यासिकेचे लिंबरकरसर, रावसाहेब काकडे,अशोक लकडे युवा उद्योजक सतिश दगडे- अभिजित काकडे, प्रविण महाराज दगडे तसेच निंबुत छपरी तील ग्रामस्थ व महिला, तरुण वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते..!
