चौधरवाडी जि परिषद शाळा आनंदबाजार..! चौधरवाडी शालेय मुलांनी भरवला आठवडी बाजार.

0
IMG-20260110-WA0077
Spread the love


चौधरवाडी~ ता. १० : चौधरवाडी (ता. बारामती जि. पुणे) येथील .जि.प.प्राथ.शाळा.व अंगणवाडी चौधरवाडी शाळेच्या मुलांनी नुकताच ग्रामपंचायत कार्यालय चौधरवाडीच्या पटांगणावर आठवडी बाजार भरवला होता. ग्रामस्थांनी बाजारात खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिले. बाजारामध्ये मुलांनी विविध वस्तूंची दुकाने मांडली होती. बाजाराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच शशांक (भैय्या) पवार, उपसरपंच राहुल चौधरी सदस्य यांच्या हस्ते झाले.


मुलांना आर्थिक व्यवहार समजावेत, शिक्षण आणि व्यवहार यांची सांगड घालावी, कोणतेही काम कमी दर्जाचे नसते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आठवडी बाजार भरवला होता. यामध्ये मुलांनी विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळभाज्या, पुस्तके विक्रीसाठी ठेवली होती. आठवडी बाजार खरेदीसाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी माजी तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती, श्री राजवर्धन दादा शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, चंद्रकांत पापळ ,सदस्य गोरख चौधरी, तानाजी भापकर, निखिल चौधरी, पोलीस पाटील राजकुमार शिंदे,सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती ( श.प ) उपाध्यक्ष चारुहंस शिंदे, कैलास पवार, रमेश चौधरी, केंद्र प्रमुख शब्बीर शेख, खामकर सर,बालगुडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्य अध्यक्ष साळवे सुचिता मॅडम, बालगुडे मॅडम, खामकर मॅडम व पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..!


सर्व ग्रामस्थांनी व पालकांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed